जगदीश शेट्टर यांचा काँग्रेसमध्ये अधिकृत प्रवेश
भाजपचे तिकीट गमावल्यानंतर पक्षाला अलविदा करणारे माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनी आज काँग्रेसमध्ये प्रवेश केला. एआयसीसीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि केपीसीसी अध्यक्ष डीके शिवकुमार यांच्या उपस्थतीत शेट्टर यांनी बंगळुर येथील केपीसीसी कार्यालयात काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि काँग्रेस नेत्यांनी शेट्टर यांचे पक्षाच्या ध्वजासह स्वागत केले.
व्हॉईस ओव्हर : केपीसीसी कार्यालयात काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना शेट्टर यांनी आज भाजप सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याचे सांगितले. हे अनेकांना आश्चर्यचकित करणारे आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि विरोधी पक्षनेते काँग्रेसमध्ये दाखल होत असल्याची चर्चा आहे. महिन्यापूर्वी खूप दुखावले होते. मी भाजपची बांधणी करणारा व्यक्ती आहे. मी संपूर्ण राज्यात विशेषतः उत्तर कर्नाटकात पक्षाचे संघटन केले. पक्षाने मला सर्व दर्जा दिला आहे. मला हे मान्य आहे. मात्र, सहा वेळा आमदार म्हणून निवडून आल्यानंतरदेखील पक्षाकडून तिकीट नाकारण्यात आल्याने जगदीश शेट्टर यांनी नाराजी व्यक्त केली.
जगदीश शेट्टर यांनी आज भाजपचा राजीनामा देऊन काँग्रेसमध्ये केल्यानंतर माध्यमांशी बोलताना सिद्धरामय्या म्हणाले, जगदीश शेट्टर मुख्यमंत्री असताना मी विरोधी पक्षनेता होतो आणि मी मुख्यमंत्री असताना ते विरोधी पक्षनेते होते. ते त्यांच्या वैयक्तिक कामासाठी कधीही भेटले नाहीत. त्यांनी पाच वर्षे विधानसभेच्या आत आणि बाहेर भाजपसाठी लढा दिला. ते खूप एकनिष्ठ होते . भाजपच्या राजकीय कार्यक्रमांमध्ये कोणतीही तडजोड झाली नाही. स्वार्थासाठी त्याग केला नाही. ते म्हणाले की, त्यांनी आमच्या सरकारविरोधात लढा दिला आहे.
लिंगायत समाज हा मोठा समाज आहे. येडियुरप्पा हे सर्वसाधारणपणे त्या समाजाचे नेते म्हणून चित्रित केले जातात. लिंगायत समाजाचे मोठे नेते म्हणून जगदीश शेट्टर यांची ओळख होती. भाजपने त्यांना जशी वागणूक दिली आहे, ती कोणत्याही पक्षातील कोणत्याही नेत्याशी घडू नये.
तर आयसीसी अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले कि , माजी मुख्यामंत्री , जगदीश शेट्टर यांच्या स्वाभिमानाला धक्का बसल्याने , त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे . त्यांचे मी स्वागत करतो . त्यांच्या कॉग्रेसमधील पक्षप्रवेशामुळे , काँग्रेसला खूप मोठं फायदा होईल . त्यांना याआधी खुप मोठ्या पदांवर काम केल्याचा अनुभव आहे . अशी व्यक्ती जेव्हा आपल्याला येऊन मिळते त्यावेळी ,पक्षाला बळकटी मिळते . यापुढे मिळून काम करू असे ते म्हणाले . यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला .
एकंदरीत गेल्या आठवडाभरापासून जगदीश शेट्टर भाजप सोडून काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा सर्वत्र सुरु होती . शेट्टर यांनी भाजपमधून राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसमध्ये अधिकृतपणे प्रवेश केला आहे . हुबळी ग्रामीण आणि मी हुबळी मध्य मतदारसंघातून , ६ वेळा विजयी झालेल्यांची दोन वेळा मुख्यमंत्री आणि मंत्री आणि विरोधी पक्षनेतेपद भूषविलेल्या शेट्टर याना भाजपने त्यांना तिकीट नाकारल्याने , त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे .


Recent Comments