Belagavi

उमेदवारी अर्ज भरण्याआधी लक्ष्मी हेब्बाळकर यांनी कुलदैवताचे दर्शन घेऊन केली पूजा

Share

मंगळवारी बेळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघासाठी काँग्रेसच्या उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करणार असलेल्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सोमवारी चिक्कहट्टीहोली येथील त्यांच्या घरचे आराध्य दैवत श्री वीरभद्र यांच्या मंदिरात जाऊन देवतेची पूजा केली.

त्यांचे भाऊ, विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी आणि कुटुंबातील इतर सदस्यांसह जाऊन त्यांनी नामनिर्देशन विषयक कागदपत्रांची पूजा केली आणि देवतेसमोर स्वाक्षरी केली.
कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी घरातील देवतेची पूजा करून आशीर्वाद घेण्याची प्रथा आहे.

म्हणून आज मी घरचे आराध्य दैवत श्री वीरभद्र यांच्या सान्निध्यात जाऊन देवाची पूजा केली. मी देवाचा आशीर्वाद घेतला आहे. मंगळवारी समर्थकांसह जाऊन , उमेदवारी अर्ज सादर करणार असल्याचे लक्ष्मी हेब्बाळकर यांनी यावेळी सांगितले.

मंगळवारी सकाळी हिंडलगा गणपती आणि सुळेभावीच्या महालक्ष्मीची पूजा करून लक्ष्मी हेब्बाळकर मोठ्या संख्येने समर्थकांसह उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

Tags: