हुक्केरी आणि यमकनमर्डी सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, निवडणूक आयोगाचे लेखा परीक्षक टी सिद्धार्थ यांनी हुक्केरी तालुक्यातील हिटनी आणि बुगटीआलूर चेक पोस्टला भेट दिली.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र आणि गोवा राज्यातून अवैधरित्या होणारी पैसा, दारू आणि मालाची अवैध वाहतूक रोखण्यासाठी हुक्केरी आणि यमकनमर्डी या राज्याच्या सीमा मतदारसंघात नेमलेल्या चेकपोस्ट अधिकाऱ्यांच्या कामकाजाचा त्यांनी आढावा घेतला आणि मार्गदर्शन केले.
यावेळी हुक्केरी तहसीलदार एस.बी.इंगळे व पोलीस अधिकारी उपस्थित होते.
Recent Comments