Belagavi

मधुकर भोसले यांचे निधन

Share

बेळगावातील चव्हाट गल्ली येथील रहिवाशी मधुकर मऱ्याप्पा भोसले यांचे चव्हाट गल्ली येथील राहत्या घरी शुक्रवारी रात्री 10 च्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले. ते 83 वर्षांचे होते.
त्यांच्या मागे दोन मुली, दोन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

त्यांच्यावर चव्हाट गल्ली स्मशानात अंत्यविधी करण्यात आले. रक्षाविसर्जन येत्या सोमवारी सकाळी 8.00 वाजता होणार आहे. बेळगांव उत्तरचे आमदार ऍड. अनिल बेनके यांचे सासरे होत.

Tags: