अथणी हेस्कॉमसमोर भाजपचे उमेदवार महेश कुमठल्ली यांनी शेतकऱ्यांसोबत आंदोलन केल्याची घटना घडली.

कृष्णा नदीकाठच्या गावांमध्ये वीजपुरवठा खंडित झाला आहे . शेतकऱ्यांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत नसल्याने शेतकऱ्यांसह हेस्कॉम कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येत आहे.
अथणीचे माजी आमदार आणि भाजपचे विद्यमान उमेदवार महेश कुमठल्ली यांनी शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला साथ दिली .
यावेळी आप्पासाहेब अवताडे, डॉ.अनील सौदागर, शशी साळवे, अशोक इलादगी, बाबागौडा पाटील, मलप्पा हंचनाला यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.


Recent Comments