Belagavi

बेळगाव जिल्ह्यामधील 18 पैकी 15 जागा काँग्रेस जिंकेल : सिद्दरामय्या

Share

राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक विधानसभा मतदारसंघ असलेल्या बेळगाव जिल्ह्यामधील 18 पैकी 15 मतदारसंघात काँग्रेस विजयी होईल, असा विश्वास विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांनी व्यक्त केला.
बेळगावात काँग्रेस भवनाच्या आवारात शनिवारी केपीसीसीचे कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांच्या प्रचाराच्या वाहनाला चालना देऊन बोलताना सिद्दरामय्या म्हणाले की, बेळगाव जिल्ह्यासह राज्यात काँग्रेसच्या समर्थनार्थ वारे वाहू लागले आहे. राज्यात भाजपच्या विरोधात लाट आहे. भाजपच्या भ्रष्टाचार, कुशासन आणि जनविरोधी कारवायांना जनता कंटाळली आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.

काँग्रेसने जाहीर केलेल्या पाच गॅरंटीमुळे जनतेचा विश्वास वाढला आहे. काँग्रेसवर जनतेचा पहिल्यापासून विश्वास आहे. यापूर्वी आम्ही सत्तेत असताना जनतेचा विश्वास जपला. आम्ही सांगितल्याप्रमाणे सर्व केले. तीच वचनबद्धता आम्ही सुरू ठेवू. यावेळी जनता काँग्रेसला साथ देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

केपीसीसीचे कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी हे बेळगाव जिल्ह्यातील सर्व भागात प्रचार करणार आहेत. आम्ही प्रचारासाठी बेळगावात आल्यावर ते आम्हाला प्रचाराचे वाहनही देतील. इतकंच नाही तर राहुल गांधी, प्रियांका गांधी, एआयसीसी अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, केपीसीसी अध्यक्ष डीके शिवकुमार हेही प्रचारासाठी येतील तेव्हा या वाहनाचा वापर करतील. मात्र सतीश जारकीहोळी बेळगाव जिल्ह्य़ातच सर्वाधिक प्रचारदौरे करणार आहेत असे त्यांनी सांगितले.

केपीसीसीचे कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी, बेलगाव ग्रामीण काँग्रेस जिल्हाध्यक्ष विनय नावलगट्टी, चिक्कोडी जिल्हाध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे, केपीसीसी सदस्य राजेंद्र पाटील आदी यावेळी उपस्थित होते.

Tags: