कर्नाटक राज्य विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने तिसरी यादी जाहीर केली आहे. विजापूर जिल्ह्यातील प्रलंबित सिंदगी आणि देवर हिप्परगी मतदारसंघासाठी उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत.
सिंदगी मतदारसंघासाठी अशोक मनगुळी यांचे नाव निश्चित झाले आहे. गेल्या 2021 च्या पोटनिवडणुकीत काँग्रेस पक्षाकडून पराभूत झालेले अशोक मनगुळी यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे, तरीही देवर हिप्परगी मतदारसंघासाठी माजी आमदार शरणप्पा सुणगार यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. यापूर्वी शरणप्पा सुणगार हे 1999 मध्ये सिंदगी मतदारसंघातून आमदार होते.
काँग्रेसने आज विजापूर जिल्ह्यातील आठ मतदारसंघांपैकी दोन उमेदवारांची घोषणा केली आहे .


Recent Comments