Banglore

आ. बेनके घाईघाईने बेंगळूरला रवाना; तिकिट मिळवून जिंकून दाखवण्याचा दावा

Share

भाजप हायकमांड आपल्या निर्णयाचा फेरविचार करून बेळगाव उत्तरमधून आपल्याला उमेदवारी देईल अशी आशा आमदार अनिल बेनके यांनी अजूनही बाळगली आहे. तिकीट मिळवून उत्तरमधून निवडणूक लढवून जिंकून दाखवेन असा दावा त्यांनी केलाय.

आ. अनिल बेनके आज सकाळी घाईघाईने बेंगळूरला रवाना झाले. तत्पूर्वी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी हा दावा केला. बेनके म्हणाले, अन्य पक्षातून निवडणूक लढविण्याच्या ऑफर्स मला आहेत. पण मी थेट कोणाशीही चर्चा केलेली नाही. जेडीएस, काँग्रेस जनार्दन रेड्डी यांच्या पक्षांनी मला उमेदवारी देण्याची तयारी दाखवली आहे. काँग्रेसने माझ्या कार्यकर्त्यांशी चर्चा केली आहे. मात्र मी अद्याप कोणाशीही थेट चर्चा केलेली नाही. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी आज बेंगळुरात आहेत.

त्यांच्याशी आणि पक्षनेत्यांशी चर्चा करण्यासाठी तसेच इतरही काही कामे आहेत त्यासाठी बेंगळूरला निघालो आहे, असे त्यांनी सांगितले. आता वेळ खूप कमी आहे, उमेदवारी अर्ज भरायचा आहे, प्रचार करायचा आहे. म्हणून गडबडीने जात आहे. तिकीट मिळवूनच निवडणूक लढवून जिंकून दाखवेन असा दावा त्यांनी केला.

एकंदर, आ. अनिल बेनके भाजपच्या उमेदवारीसाठी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करताना दिसत आहेत. इतर पक्षांच्या ऑफर्स आहेत असे सांगतानाच तिकीट मिळवून निवडणूक लढवून जिंकून दाखवेन असा दावा त्यांनी केलाय. आता नेमक्या कोणत्या पक्षाचे तिकीट ते मिळवतात हे गूढ उलगडण्यासाठी काही दिवस प्रतीक्षा करावी लागेल हे निश्चित.

Tags: