चिक्कोडी शहरातील सेवा सदन रुग्णालयातर्फे अवयवदान व रक्तदान याविषयी जनजागृती रॅली काढण्यात आली.

सेवा सदन हॉस्पिटलपासून सुरू होऊन ही जनजागृती रॅली , अंकली खुट , बसव सर्कल , इंदिरा नगर, बस स्टेशन, केसी रोड, सेवा सदन हॉस्पिटल येथे समाप्त झाली.
या रॅलीत सेवासदन हॉस्पिटलच्या ग्रुप मार्केटिंग प्रमुख मुझफ्फर महालदार, चिक्कोडी सेंटरच्या प्रमुख कलावती कमते, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह संतोष कुराडे, स्पंदन पॅरामेडिकल कॉलेजचे प्राचार्य एस.एस.गुडीमठ, प्रशासक श्रीशैल बिज्जर्गी आणि विद्यार्थी उपस्थित होते.
सेवा सदन हॉस्पिटलचे ग्रुप मार्केटिंग हेड, मुझफ्फर महालदार तसेच केंद्राच्या प्रमुख कलावती कामते यांनी माध्यमांशी बोलताना अवयवदान आणि रक्तदानाचे महत्त्व सांगितले.


Recent Comments