Agriculture

खनगावजवळ मुख्य जलवाहिनी फुटली; बेळगावचा पाणी पुरवठा विस्कळीत

Share

हिडकल धरणातून कच्च्या पाण्याचा पुरवठा करणारी 1000 मिमी व्यासाची मुख्य पाईप खनगावजवळ फुटली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी गळती होऊन बेळगाव शहराचा पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे.

बेळगाव शहराला राकसकोप आणि हिडकल या दोन धरणातून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येतो. त्यापैकी हिडकल जलाशयातून पाणीपुरवठा करणारी 1000 मिमी व्यासाची मुख्य पाईपलाईन खनगावजवळ फुटली आहे. त्यामुळे फुटलेली जलवाहिनीतून मोठे कारंजे निर्मण होऊन लाखो लिटर पाणी उसळून वर येऊ लागले. गळतीच्या ठिकाणी रस्त्याला मोठे भगदाड पडले आहे. त्यातून मौल्यवान पाणी वाया गेले. मोठ्या प्रमाणात पाणी गळती होऊन बेळगाव शहराचा पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे.

कर्नाटक पाणी पुरवठा मंडळाने जलवाहिनी बदलण्यासाठी तातडीची दुरुस्तीची कामे सुरु केली आहेत. मात्र यामुळे दिनांक 15.04.2023 आणि 16.04.2023 हे दोन दिवस बेळगाव शहरातील पाणी पुरवठ्याचे वेळापत्रक प्रभावित होईल असे मंडळाच्या सूत्रांनी सांगितले.

Tags: