उमेदवारी मिळो न मिळो, आपल्यासाठी पक्षादेश शिरोधार्ह आहे असे भाजप नेते किरण जाधव यांनी सांगितले.
बेळगावात आंबेडकर जयंती समारंभात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना भाजप ओबीसी मोर्चाचे राज्य सचिव किरण जाधव यांनी उमेदवारी न मिळाल्याबाबत प्रतिक्रिया दिली. आपण बेळगाव दक्षिणमधून भाजपच्या उमेदवारीसाठी इच्छुक होतो हे सत्य आहे. परंतु पक्षाने उमेदवारी नाकारल्याने आपण नाराज नाही.
शेवटी पक्षादेश, पक्ष निर्णय आपल्यासाठी महत्वाचा आहे. गेली 20वर्षे मी भाजपमध्ये असून पक्षाच्या मजबुतीसाठी योगदान दिले आहे. पण त्याहीपूर्वी मी संघाच्या संस्कारात वाढलो आहे. पक्षाने सर्व्हे, जनता व कार्यकर्त्यांचे मत विचारात घेऊन, उमेदवार निश्चित केले आहेत. कदाचित माझे नाव सर्व्हेत आले नसेल. म्हणून मी नाराज नाही, पक्ष सोडणार नाही. उलट पक्षाशी एकनिष्ठ राहून ज्यांना उमेदवारी दिली त्यांचा प्रचार करणार आहे. बेळगाव दक्षिणसोबतच उत्तर आणि ग्रामीणमध्ये भाजपच्या उमेदवारांसाठी शक्तीनिशी प्रचार करणार आहे. बूथ लेव्हलपासूनचे कार्यकर्ते, जनता भाजपच्या पाठीशी समर्थपणे आहे,
बेळगाव उत्तर, दक्षिण आणि ग्रामीण तिन्ही मतदार संघात आम्ही नक्की जिंकू याचा विश्वास असल्याचे किरण जाधव यांनी सांगितले. बाईट
अन्य पक्षातून उमेदवारीची ऑफर आली असली तरी, आपण भाजप सोडणार नाही असेही किरण जाधव यांनी यावेळी स्पष्ट केले.


Recent Comments