बेळगाव दक्षिण मतदार संघातून महाराष्ट्र एकीकरण समितीची उमेदवारी आपल्यालाच मिळेल असा विश्वास श्रीराम सेना हिंदुस्थानचे संस्थापक प्रमुख रमाकांत कोंडुसकर यांनी व्यक्त केलाय.
बेळगावात आंबेडकर जयंती कार्यक्रमात भाग घेतल्यानंतर श्रीराम सेना हिंदुस्थानचे संस्थापक प्रमुख रमाकांत कोंडुसकर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. बेळगाव दक्षिणमधून निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्या त्यांनी, महाराष्ट्र एकीकरण समितीकडे या मतदार संघातून उमेदवारीची मागणी केली आहे. ते म्हणाले, भाजप सरकारकडून राज्य आणि देशातील विध्यार्थी, युवक, शेतकरी, कष्टकरी, कामगार महिला अशा सर्वच समाजघटकांवर अन्याय होतोय. बेळगाव दक्षिण मतदार संघात भ्रष्टाचार माजला आहे.
सर्वसामान्यांवर अन्याय होतोय. व्यावसायिक, बिल्डर्स आदींवर खोटे आरोप ठेवून त्यांचा छळ केला जातोय, या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी मी कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर निवडणूक लढविण्याचे ठरविले आहे. बाबासाहेब आंबेडकर यांच्या, ‘शिका, संघटित व्हा, संघर्ष करा’ या शिकवणुकीनुसार सर्वांना समान हक्क, न्याय मिळावेत हा माझा हेतू आहे. तो अमलात आणण्यासाठीच मी निवडणूक रिंगणात उतरलो आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीची उमेदवारी आपल्याला नक्की मिळेल, आणि या मतदार संघातून आपण नक्कीच जाणून येऊ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. बाईट
एकंदर, जनतेवरील अन्याय दूर करण्यासाठी निवडणूक लढवीत असल्याचा दावा रमाकांत कोंडुसकर यांनी केलाय. त्यात त्यांना कितपत यश येते हे लवकरच कळेल.


Recent Comments