बेळगाव ग्रामीणच्या आ. लक्ष्मी हेब्बाळकर यांनी आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन केले.

बेळगावातील आंबेडकर उद्यानात आज जिल्हा प्रशासन आणि विविध दलित संघटनांतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर बेळगाव ग्रामीणच्या आ. लक्ष्मी हेब्बाळकर यांनी कार्यकर्त्यांसमवेत आज आंबेडकर उद्यानात जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे सामाजिक क्रांतीचे प्रणेते होते. समताधारित समाज निर्मिती करण्यासाठी त्यांनी देशाला जगात आदर्श ठरणारी घटना दिली. आजच्या दिनी त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करून त्यांना अभिवादन करणे हे आपले सर्वांचे कर्तव्य आहे असे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी दलित नेते मल्लेश चौगुले, सिद्दप्पा कांबळे, भाऊ गडकरी आदी उपस्थित होते.


Recent Comments