Belagavi

बाबासाहेबांची घटना हे भारतीयांचे संरक्षण कवच : फिरोज सेठ

Share

 

बाबासाहेबांची घटना हे भारतीयांचे संरक्षण कवच : फिरोज सेठ
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली घटना हे भारतीयांचे संरक्षण कवच आहे, या घटनेतून त्यांनी भारतीयांना समानतेने जगण्याचे मूलभूत अधिकार दिले असे बेळगाव उत्तरचे माजी आमदार फिरोज सेठ यांनी सांगितले.

बेळगावात आंबेडकर उद्यानात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला त्यांच्या जयंतीनिमित्त माजी आमदार फिरोज सेठ यांनी अभिवादन केले. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले, बाबासाहेब आंबेडकर काँग्रेसमध्येच होते. त्यामुळे त्यांची अन काँग्रेसची विचारधारा एकच होती व आहे. ते खऱ्या अर्थाने भारतरत्न आहेत. त्यांचे सामाजिक समानतेचे विचार, दूरदृष्टीकोन यामुळेच त्यांनी सर्वाना माणूस म्हणून सन्मानाने जगण्याचा अधिकार दिला. आज देशात सांप्रदायिक शक्ती समाजात दुही पसरवण्याचे काम करत आहेत. त्या कोण हे जनतेला माहित आहे. या परिस्थितीत बाबासाहेबांचे विचारच देशाला तारून नेऊ शकतील असे त्यांनी सांगितले. राज्यात व देशात समाज फोडण्याचे काम भाजप करत आहेत. त्यांचा काळ संपत आला आहे. कर्नाटकातील विधानसभा निवडणूक ही भाजपच्या पराभवाची नांदी ठरेल, 2024च्या लोकसभा निवडणुकीत संपूर्ण देशात भाजप भुईसपाट होईल असा विश्वास फिरोज सेठ यांनी व्यक्त केला.

यावेळी विविध दलित संघटनांचे तसेच काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.

 

Tags: