कर्नाटकात कृषी उद्योगात आघाडीवर असणाऱ्या अक्षय ऍग्रो सेल्स प्रायव्हेट लिमिटेडने आता वाहन विक्री उद्योगात प्रवेश केला आहे. बेळगावात आज “अक्षय टीव्हीएस” या त्यांच्या अथोराइज्ड टीव्हीएस डीलर शोरुमचा शानदार उदघाटन समारंभ पार पडला.
देशातील वाहन उद्योगात आघाडीवर असलेल्या टीव्हीएस कंपनीची आणखी एक शोरूम बेळगावकरांच्या सेवेस सज्ज झाली आहे. बेळगावातील नेहरुनगर, कोल्हापूर सर्कलमध्ये रामदेव हॉटेलजवळ “अक्षय टीव्हीएस” या शोरुमचा शानदार उदघाटन समारंभ पार पडला. कर्नाटकात कृषी उद्योगात आघाडीवर असणाऱ्या अक्षय ऍग्रो सेल्स प्रायव्हेट लिमिटेडने आता वाहन विक्री उद्योगात प्रवेश केला आहे. दावणगेरेनंतर आता बेळगावात त्यांनी ही आपली दुसरी शोरूम सुरु केली आहे. स्पेअर पार्टस, सुसज्ज सर्व्हिस सेंटर, वक्तशीर सेवा आणि ग्राहकांना उत्तम आपुलकीची वागणूक देण्यासाठी ही भव्य, सुसज्ज शोरूम बेळगावकरांच्या सेवेत दाखल झाली आहे.

लक्ष्मेश्वरचे माजी आमदार सी. एस. गड्डदेवरमठ यांनी फीत कापून सुसज्ज “अक्षय टीव्हीएस” शोरूम आणि सर्व्हिस सेंटरचे उदघाटन केले. त्यानंतर त्यांनी शोरुमची पाहणी केली.
दरम्यान, “अक्षय टीव्हीएस” शोरूमबाबत बोलताना अक्षय ऍग्रो सेल्स प्रायव्हेट लिमिटेडचे चेअरमन व मॅनेजिंग डायरेक्टर श्रीपाद हेर्लेकर यांनी सांगितले की, 37 वर्षांपूर्वी अक्षय ऍग्रो सेल्स प्रायव्हेट लिमिटेडची स्थापना करण्यात आली होती. सचोटीने व्यवहार केल्यामुळे ग्राहकांचा विश्वास संपादन करून हा उद्योग भरभराटीला आलाय. त्यानंतर वाहन विक्री उद्योगात उतरण्याचे ठरवून अलीकडेच दावणगेरे येथे टीव्हीएस वाहनविक्री आणि सर्व्हिस शोरुमची सुरवात करण्यात आली आहे. त्यानंतर आज बेळगावात दुसऱ्या “अक्षय टीव्हीएस” शोरूमचे उदघाटन करण्यात आले असून, येथे ग्राहकांना तत्पर सेवा देण्यात येईल असे त्यांनी सांगितले.
यावेळी बोलताना अक्षय ऍग्रो सेल्स प्रायव्हेट लिमिटेडचे डायरेक्टर (फायनान्स) एस. सी. मूर्ती यांनी सांगितले की, 37 वर्षांपूर्वी, 1996 मध्ये एल छोट्या कंपनीतील नोकरी सोडून आम्ही समविचारी मित्रांनी श्रीपाद हेर्लेकर यांच्या नेतृत्वाखाली अक्षय ऍग्रो सेल्स प्रायव्हेट लिमिटेडची स्थापना केली. पारदर्शक व्यवहार, ग्राहकांना तत्पर सेवा दिल्याने आज ही कंपनी कर्नाटकात आघाडीवर आहे. आता वाहनविक्री व्यवसायात आम्ही उतरलो असून, दावणगेरे येथे काही महिन्यांपूर्वी पहिली शोरूम सुरु करून आता बेळगावात दुसरी शोरूम सुरु करत आहोत. टीव्हीएस कंपनीच्या वाहनांची विक्री आणि विक्रीपश्चात सेवा सुयोग्य दरात देण्यात येणार आहे. ग्राहकांच्या पाठिंब्याने लवकरच आमची शोरूम प्रगती करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
लक्ष्मेश्वरचे माजी आमदार सी. एस. गड्डदेवरमठ यांनी अक्षय ऍग्रो सेल्स प्रायव्हेट लिमिटेडच्या संचालकांचे अभिनंदन करून त्यांच्या नव्या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.
यावेळी टीव्हीएस मोटर्सचे नॅशनल सर्व्हिस मॅनेजर विकास सैनी, एरिया सेल्स मॅनेजर पी. मोहम्मद हुसेन, आनंदस्वामी गड्डदेवरमठ, बेळगाव ऍग्री सेल्स असोसिएशनचे अध्यक्ष मल्लिकार्जुन बेल्लेरीमठ, रामचंद्र हनमरेड्डी, सोमशेखर ओदुनवर आदी उपस्थित होते.
यावेळी अनेक हितचिंतकांनी “अक्षय टीव्हीएस” शोरूमला भेट देऊन संचालकांना शुभेच्छा दिल्या.


Recent Comments