Belagavi

आविष्कारी प्रकल्पांतून विध्यार्थ्यानी घडविले प्रतिभेचे प्रदर्शन

Share

कचऱ्याचे पर्यावरणपूर्वक व्यवस्थापन, पाण्याचे शुद्धीकरण अशा विविध प्रकल्पातून अनोखे शास्त्रीय आविष्कार घडवून विध्यार्थ्यानी आपल्या प्रतिभा-कौशल्याचे दर्शन बेळगावात आज घडविले. निमित्त होते, जीआयटी महाविद्यालयात भरवलेल्या “तंत्रज्ञ” या प्रोजेक्ट एक्झीबिशनचे !

बेळगावातील केएलएस संस्थेच्या गोगटे इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी अर्थात जीआयटीमध्ये बीई अभियांत्रिकीच्या विविध शाखांमधील प्रथम वर्षाच्या विध्यार्थ्यांसाठी “तंत्रज्ञ” या प्रोजेक्ट एक्झीबिशनचे आयोजन करण्यात आले. सुमारे 450 विध्यार्थ्यानी प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली परिश्रम घेऊन विविध विषयांवरचे एकूण 92 आविष्कार प्रकल्प या प्रदर्शनात मांडले. इंडस्ट्रिअल ऑटोमेशन, रोबोटिक्स, प्रदूषण नियंत्रण अशा विविध विषयांवर आधारित प्रकल्पांचा त्यात समावेश होता.

यावेळी पाणी शुद्धीकरण प्रकल्प सादर केलेल्या सृष्टी या विद्यार्थिनीने सांगितले की, मी या प्रकल्प प्रदर्शनात पाणी शुद्धीकरण प्रकल्प सादर केला आहे. यातून अशुद्ध पाणी ओळखून ते शुद्ध करण्याची प्रक्रिया दाखवली आहे. जीआयटी संस्थेने, प्राचार्य आणि प्राध्यापकांनी आम्हा विध्यार्थ्यांना आमच्या कौशल्य, प्रतिभेचे दर्शन घडविण्याची संधी दिली आहे. त्याबद्दल आम्ही त्यांचे ऋणी आहोत असे तिने सांगितले.

प्रदर्शनाचे संयोजक प्रा. डॉ. महेश कोरी यांनी सांगितले की, सलग तिसऱ्या वर्षी आम्ही विद्यार्थ्यांमधील प्रतिभा-कौशल्याला वाव देण्यासाठी ‘तंत्रज्ञ’ प्रकल्प प्रदर्शन उपक्रमाचे आयोजन केलं आहे. नव्या राष्ट्रीय धोरणाच्या उद्दिष्टानुसार विध्यार्थ्यांमधील कौशल्य विकसनावर यात भर देण्यात आला आहे. या प्रदर्शनात अभियांत्रिकीच्या विविध शाखांच्या पहिल्या वर्षातील सुमारे 450 विध्यार्थ्यानी प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली परिश्रम घेऊन विविध विषयांवरचे एकूण 92 आविष्कार प्रकल्प या प्रदर्शनात मांडले आहेत. त्यात प्रामुख्याने इंडस्ट्रिअल ऑटोमेशन, रोबोटिक्स, प्रदूषण नियंत्रण अशा विविध विषयांवर आधारित प्रकल्पांचा समावेश आहे.

जीआयटीने भरविलेल्या या प्रदर्शनाला विविध अभियांत्रिकी शाखांच्या सर्व सेमिस्टरच्या विध्यार्थी-प्राध्यापकांनी भेट देऊन प्रकल्पांची पाहणी करून विध्यार्थ्यांच्या प्रतिभा आणि कौशल्याचे कौतुक केले. एकंदर, पहिल्या वर्षाच्या अभियांत्रिकी विध्यार्थ्यांसाठी प्रकल्पप्रदर्शन आयोजित करून जीआयटीने त्यांच्या प्रतिभा आणि कौशल्याचा विकास होण्यासाठी एक स्तुत्य उपक्रम राबविला असेच म्हणावे लागेल.

Tags: