भरदिवसा रिक्षातूनच येऊन घरासमोर उभी केलेली रिक्षा लांबवल्याची खळबळजनक घटना बेळगावात टिळकवाडीतील सोमवार पेठेत नुकतीच घडली आहे.
होय, टिळकवाडीतील सोमवार पेठेतील घर क्र. ५ समोर उभी केलेली रिक्षा दुपारी साडेबाराच्या सुमारास लांबवण्यात आली आहे. मालक अजय शहापूरकर यांनी मंगळवारी (ता. ११) ही रिक्षा आपल्या घरासमोर उभी केली होती. त्यानंतर एका रिक्षातूनच आलेल्या चोरटयांनी ती लांबवली.
या चोरीचे दृश्य येथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झाले आहे. केए २२ बी ३३ क्रमांकाच्या या रिक्षाचा परमिट क्र.
१३८६ आहे. पांढरा फायबर टॉप आणि बॉडी कलर काळा आहे.
याबाबत रिक्षाचे मालक अजय शहापूरकर यांनी टिळकवाडी पोलीस स्थानकात फिर्याद दाखल केली असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस तपास करत आहेत
Recent Comments