बेळगाव उत्तर मतदारसंघासाठी महाराष्ट्र कीकरण समितीने माजी नगरसेवक ॲड. अमरवेलकर यांना आपली उमेदवारी जाहीर केली आहे.
त्यामुळे महाराष्ट्र एकीकरण समितीच्या निष्ठावंत कार्यकर्त्याला उमेदवारी मिळाल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
तसेच या उमेदवारीचे मराठी बांधवांनी उत्साहात स्वागत केले आहे.
उमेदवार अमर येळ्ळूरकर यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना,
उत्तर मतदार संघातून समितीला विजयी करणे काळाची गरज असल्याचे मत व्यक्त केले.
मतदार संघातील जनतेला आपल्याला कौल दिला असून जनतेला समितीच्या विजयाची इच्छा आहे.
निवड समितीने पारदर्शक पद्धतीने उमेदवार निवडीचे कार्य केले असून आता सगळ्यांनी एक
धैर्याने निवडणुकीला सामोरे जायचे आहे. यासाठी एकीची वज्रमूठ आवळून मराठीचे अस्तित्व अबाधित राखणे महत्वाचे असल्याचे येळ्ळूरकर म्हणाले.


Recent Comments