माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी याना भाजपने तिकीट नाकारल्यानंतर , काँग्रेसचे कागवाडचे उमेदवार राजू कागे यांनी त्यांच्या निवासस्थानाला सकाळीच भेट दिली . त्यानंतर त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली .

लक्ष्मण सवदी यांच्या निवासस्थानाला भेट दिल्यासंदर्भात प्रसारमाध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना , काँग्रेसचे कागवाडचे उमेदवार राजू कागे यांनी सांगितले कि , लक्ष्मण सवदी आणि मी चांगले मित्र आहोत . तिकीट न मिळाल्याने मी त्यांचे सांत्वन केले आहे . आम्ही दोघे एकत्र गेलो तर तालुक्याचे चांगलेच होईल.ते आमच्यासोबत आले तर बरे होईल.
राज्याच्या एकाही नेत्याने मला सवदी यांच्या निवासस्थानी पाठवलेले नाही . मी त्यांना माझे वैयक्तिक मत सांगितले. काँग्रेस आल्यास त्यांना चांगला दर्जा दिला जाईल.
मला कोणतेही मंत्रिपद दिले तर मी सावधगिरी बाळगून त्याग करेन. सवदी काँग्रेसमध्ये आले तर तर बरे होईल. असे राजू कागे यांनी अथणी येथे सांगितले .


Recent Comments