एनसीसी मुख्यालय, नवी दिल्लीचे , अतिरिक्त डीनरल जनरल, मेजर जनरल परमवीर सिंग सेहरावत यांनी , 12 एप्रिल 2023 रोजी प्रशासकीय तपासणीचा भाग म्हणून एनसीसी समूह आणि त्याच्या युनिट्सना भेट दिली.
मेजर जनरल परमवीर सिंग सेहरावत यांनी बेळगाव ग्रुपचे उपस्थित अधिकारी, सहयोगी NCC अधिकारी, कर्मचारी आणि कॅडेट्स यांना संबोधित केले. एनसीसी कॅडेट्सनी सर्वच क्षेत्रात केलेल्या चांगल्या कामाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. NCC “एकता आणि शिस्त” च्या नीतिमत्तेचे पालन करण्यावरही त्यांनी भर दिला.

एअर कमोडोर बी एस कंवर (VSM), उपमहासंचालक, कर्नाटक आणि गोवा संचालनालय. , कर्नल के श्रीनिवास, कर्नल एस दर्शन, विंग कमांडर दीपक बल्हरा, लेफ्टनंट कर्नल सी बी नंदकुमार आणि एनसीसीच्या विविध युनिट्सचे कर्मचारी उपस्थित होते.


Recent Comments