Belagavi

आंबेडकर जयंतीबाबत दलित संघटनांची बैठक

Share

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त बेळगावात दलित संघटनांची पूर्वतयारीची बैठक पार पडली. निवडणूक आचारसंहितेचा भंग होऊ नये याची दखल घेत अर्थपूर्णरीत्या जयंती साजरी करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा जोतिबा फुले जयंती भव्य प्रमाणात साजरी करण्यासंदर्भात विचार करण्यासाठी बेळगावातील आंबेडकर उद्यानात दलित संघटनांची बैठक घेण्यात आली. विविध दलित संघटनांचे नेते यावेळी उपस्थित होते.

निवडणूक आचारसंहितेचा भंग होऊ नये यासाठी सर्वांनी एकत्रितपणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती अर्थपूर्णरीत्या साजरी करावी असे आवाहन दलित नेते मल्लेश चौगुले यांनी केले. या दिवशी सकाळी ९ वाजता आंबेडकर उद्यानात आंबेडकर ज्योत मिरवणुकीला प्रारंभ होईल, त्यानंतर विविध मार्गांवर फिरून मिरवणूक चन्नम्मा चौकातून आंबेडकर उद्यानात येईल. त्यानंतर ज्येष्ठ दलित नेते के. डी. मंत्रेशी यांचे व्याख्यान होईल. जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, समाजकल्याण खाते आदींच्या सहयोगाने जिल्ह्यातील विविध परीक्षांत सर्वाधिक गुण मिळवलेल्या दलित विद्यार्थ्यांचा सत्कार यावेळी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या दिवशी डीजेला परवानगी द्यायलाच हवी, अशी मागणी दलित नेत्यांनी केली. शासनाचे नियम पाळावेत असे निवडणूक धोरण असल्याने यासाठी जिल्हा प्रशासनाची कोणतीही परवानगी नसल्याचे ते म्हणाले.

यावेळी दलित नेते मल्लेश चौगुले, मल्लेश कुरंगी, बसवराज रायवगोळ, शंकर कांबळे, संतोष हलगेकर, मोहन कांबळे, लक्ष्मण कोलकार, सागर चौगुले आदी उपस्थित होते.

Tags: