Athani

सवदी यांच्या नेतृत्वाखाली लढवणार निवडणूक

Share

सवदी यांच्या नेतृत्वाखाली आपण निवडणूक लढवणार असल्याचे , आ . महेश कुमठल्ली यांनी सांगितले .

भाजपाची अधिकृतपणे उमेदवारी जाहीर झाल्यानंतर , अथणीमध्ये माध्यमांना प्रतिक्रिया देताना उमेश कुमठल्ली यांनी सांगितले कि , भाजप पक्षाने मला उमेदवारी दिली आहे. आपण आजपर्यंत केलेली विकास कामे पाहून जनता आपल्याला साथ देईल .

मागच्या वेळी तुम्ही काँग्रेसमधून भाजपमध्ये आला होता. आता सवदी भाजप सोडून काँग्रेसमध्ये जात आहेत, असे माध्यमांनी विचारले असता , ते म्हणाले कि , रमेश जारकीहोळी यांच्या नेतृत्वाखाली ही राजकीय घटना होती.

सवदीनी बंडखोरी केली तर तुमचा विजय होईल कि नाही या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले कि , काही परिणाम होणार नाही , आणि ते पक्ष सोडतील असे मला वाटत नाही. त्यांच्या नेतृत्वाखाली मी माझी निवडणूक लढवणार असल्याचे कुमठल्ली यांनी सांगितले. तुम्हाला तिकीट मिळाले नाही त्तर, मलाही तिकीट नको, या रमेश यांच्या वक्तव्याबाबत माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले कि, आम्ही त्यांच्यासोबत आलो, त्यांना तिकीट न दिल्यास अन्याय होईल, असे ते म्हणाले.
आम्हाला संधी दिल्याबद्दल भाजप नेत्यांचे कुमठल्ली यांनी आभार मानले . तुम्हाला भाजपकडून तिकीट कोणत्या निकषावर मिळाले असे विचारले असता ते म्हणाले कि ,
मी आधीच 5 वर्षे काम केले असल्याने तिकीट मिळाले, आता पक्षाने पुन्हा संधी दिल्याचे त्यांनी सांगितले .

Tags: