Athani

अवैधरित्या लपवून ठेवलेली दारू जप्त

Share

अथणी पोलिसांनी बेकायदेशीररीत्या साठवून ठेवलेली 24 बॉक्स दारू जप्त करून एका आरोपीला अटक केली.

तालुक्यातील आवरखोड गावातील एका घरावर छापा टाकून सुमारे 72960 रुपये किमतीचे सुमारे एकूण 24 बॉक्स दारू जप्त करण्यात आली. आरोपी हनुमंत प्रकाश कांबळे याला ताब्यात घेण्यात आले आहे.

डीएसपी श्रीपाद जल्दे , अथणी सीपीआय रवींद्र नायकोडी, त्यांच्या मार्गदर्शनाखाली अथणीचे पीएसआय शिवशंकर मुकरी, अतिरिक्त पीएसआय चंद्रू सगनूर आणि कर्मचारी रमेश हादिमनी, श्रीधर बांगी , महांतेश खोत , रमेश कदम यांचा सहभाग होता.अथणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Tags: