बेळगावातील आराधना महिला मंडळाच्या वतीने आयोजित धार्मिक संस्कार शिबिराचा आज प्रारंभ करण्यात आला.
मंगळवार 11.04.2023 ते 18.04.2023 या कालावधीत श्री. पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर, चिक्कबस्ती येथे हे धार्मिक संस्कार शिबिर आयोजित करण्यात आले आहे. जैन युवा मंचचे अध्यक्ष सुनील चौगले व कीर्ती कागवाड यांनी दीपप्रज्वलन करून शिबिराचे उद्घाटन केले.

या शिबिरात 100 हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे.


Recent Comments