मी कोणावरही भाष्य करणार नाही, हायकमांडला उमेदवारांची यादी जाहीर करू द्या, मी नंतर सांगेन, या महिन्याच्या 13 तारखेला मतदारसंघात बैठक बोलावून निर्णय घेईन, जर लोकांनी निवडणूक लढवण्याचा आग्रह केला तर लढवेन असे सांगत विधान परिषद सदस्य व माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी आज नवा बॉम्ब फोडला.

लक्ष्मण सवदी यांनी निवासस्थानी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, लोक बुड म्हणतील तर मी बुडेन, लोक घरी रहा म्हणाले तर मी घरी राहीन. जर लोकांनी निवडणूक लढवण्याचा आग्रह केला तर लढवेन. दहा वर्षांपासून लोक माझे ऐकत आहेत, पण आता मला लोक काय म्हणतात ते ऐकावे लागेल. यावेळी मी जनतेच्या दरबारात जाऊन जनता काय म्हणेल ते करेन.
माझ्याशी संपर्क करून बोलून, निर्णय घेऊ, असे मुख्यमंत्र्यांनी दिल्लीत सांगितले, त्यांचा संपर्क झाल्यावर माझा निर्णय घेईन असे सवदी म्हणाले.
तिकीट वाटपात कोणताही गोंधळ नाही, एकतर महेश कुमठळ्ळी यांना द्यायचे किंवा मला द्यायचे नाही तर तिसऱ्या व्यक्तीला द्यायचे. मतदार संघातील लोकांना मी हवा की, दुसरा कोणीतरी हवा हे विचारतो. कारण शेवटी जनतेचा निर्णय अंतिम असतो. मला हायकमांडकडून कोणताही फोन किंवा संदेश आलेला नाही, पूर्वी टेलीग्राम यायचे, आता येत नाहीत असे ते म्हणाले.
काँग्रेसमध्ये सामील होण्यासंदर्भात बोलताना, मान्सून केव्हा येईल हे माहीत नाही असे विधान त्यांनी केले.


Recent Comments