उत्तर कर्नाटकातील तगडे नेते उमेश कत्ती यांच्या निधनामुळे हुक्केरी मतदारसंघाच्या निवडणूक उत्सुकता निर्माण झाली आहे.

हुक्केरी मतदान केंद्रावर कोणत्याच पक्षाकडून निवडणूक लढविल्याचे उदाहरण नाही, उमेश कत्ती ज्या पक्षाकडून निवडणूक लढवतील त्यांना विजय मिळत असे, मात्र उमेश कत्ती यांच्या निधनानंतर मतदारसंघातील विविध पक्षांच्या हालचाली ठप्प झाल्या आहेत. तरूणांचा एक गट आणि काँग्रेसचे नगरसेवक गटाने गावोगावी जाऊन प्रचार करीत आहेत .
भारतीय जनता पक्षाकडून उमेश कत्ती यांचे चिरंजीव निखिल कत्ती आणि भाऊ रमेश कत्ती हे त्यांच्या समर्थकांसह प्रचार करत आहेत मात्र भाजपकडून अधिकृत उमेदवार जाहीर करण्यात आलेला नसून, कत्ती कुटुंबातील कोणाला तिकीट मिळेल त्याला आशीर्वाद देण्यासाठी ते प्रत्येक गावात प्रचार करत आहेत.
या सर्व घडामोडींमध्ये माजी मंत्री शशिकांत नाईक यांनी पडद्याआडून भाजपच्या राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांशी संपर्क साधून तिकीट मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
तसेच चिक्कोडीचे जिल्हाध्यक्ष राजेश नेर्ली हे जोल्ले गटाच्या सहकार्याने हुक्केरी मतदारसंघाचे तिकीट मिळविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. 10 एप्रिलनंतर भाजपचा स्पष्ट उमेदवार जाहीर केला जाईल.
मात्र, यावेळी हुक्केरी मतदारसंघात भाजप आणि काँग्रेसमध्ये थेट लढत होणार आहे.
माजी नगरसेविका शरीफा नदाफ यांनी मतदारसंघात जेडीएस पक्षाकडून तिकीट मागितले आहे.शरीफा नदाफ या मतदारसंघात पहिल्यांदाच महिला उमेदवार म्हणून निवडणूक लढवत असल्याचे सांगतात.
त्यानुसार निवृत्त पोलीस उपअधीक्षक गणपती गुडज यांनीही शेतकरी संघटनेच्या नेत्यांच्या संपर्कातून जेडीएसचे प्राथमिक सदस्यत्व मिळवून पक्षाला एक लाख रुपये देऊन तिकीट मागितल्याचे सांगण्यात येते.
एकूणच या विधानसभा निवडणुकीत हुक्केरी मतदारसंघातील मतदार कोणाला मतदान करणार याची प्रतीक्षा करावी लागणार आहे.


Recent Comments