Belagavi

कडक उन्हामुळे वाढला लिंबाचा दर

Share

उन्हाच्या तडाख्यात थंडगार लिंबू सरबत प्यायले कि , तनमन शांत होते . मात्र आता लिंबाचा दर वाढल्याने ही शांती , कुठच्या कुठे निघून गेलीय .

होय , बागलकोट , विजापूर येथील लिंबाचे उत्पादन आता कमी झाल्याने, आवाक देखील मंदावली आहे . याचा परिणाम , बेळगाव बाजारपेठेवर झाला असून , बाजारात लिंबाचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर झाला आहे . सध्या बाजारात एका लिंबूचा दहा रुपये मोजावे लागत आहेत . यामुळे उन्हाळ्यात थंडगार लिंबूसरबत देखील महागले आहे .

यासंबंधी लिंबू विक्रेता व्यंकटेश सोनार याने सांगितले कि , सध्या उन्हाळ्यामुळे लिंबाची वाढत मागणी असली तरी लिंबू दरवाढीमुळे एका लिंबाचा दर दहा रुपये इतका आहे . ५० रुपयांना सहा लिंबू देत आहोत . हॉटेलसहित , कोल्ड्रिंकच्या दुकानातून देखील लिंबाना मागणी जास्त आहे .

तर दुसरे विक्रेते , गुलाम रसूल यांनी सांगितले कि , ५० रुपयांना ५ ते ६ लिंबू असा दर आहे . माध्यम आकाराची लिंबू २० रुपयाना ३ ते ४ अशी देत आहोत . विजापूर , बागलकोट आदी ठिकाणी आता लिंबाचे उत्पादन कमी झाले असून , आवक देखील मंदावली आहे . परिणामी बेळगाव बाजारपेठेत लिंबाचे दर वाढले आहेत . मागच्या वर्षीच्या तुलनेत हे दर खूपच जास्त आहेत .

एकंदर उन्हाळ्यात तसेच दैनंदिन वापरात लिंबाचे महत्व अनन्यसाधारण आहे . मात्र ही लिंबे महाग झाल्याने , ग्राहकांची खरेदीसाठी म्हणावी तशी गर्दी दिसत नाही .

Tags: