संकेश्वर चेकपोस्टवर 2.31 लाखाचा तांदूळ जप्त जप्त करण्यात आला आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेळगाव जिल्ह्यात ठिकठिकाणी मतदारांना वाटण्यासाठी होणारी पैसे आणि वस्तूंची अवैध वाहतूक रोखण्यासाठी चेकपोस्टस उभारण्यात आली आहेत. तेथे योग्य कागदपत्रांअभावी नेण्यात येणारी रोख रक्कम, मद्य, दागिने,
साड्या आदी साहित्य जप्त करण्यात आले आहे. मात्र आज प्रथमच संकेश्वर चेक पोस्टवर समर्पक कागदपत्रांअभावी
नेण्यात येणारा 2.31 लाख रुपये किंमतीचा 10 टन तांदूळ जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी संकेश्वर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Recent Comments