Chikkamagaluru

.. तर आर. अशोक यांचे स्वागतच करू : डीकेशी

Share

जर आर. अशोक माझ्याविरुद्ध निवडणूक लढवतील तर त्यांचे स्वागत केले जाईल असे केपीसीसीचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी सांगितले.

शृंगेरी येथे आज प्रसारमाध्यमांशी बोलताना केपीसीसीचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार म्हणाले की, राजकारणात जो येईल त्याला आव्हान दिले पाहिजे, लढले पाहिजे. राजकारणात कोणीही कोणाच्याही विरोधात उभे राहू शकते. स्पर्धेसाठी आपले स्वागत आहे असे ते म्हणाले.

मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून मल्लिकार्जुन खर्गे यांच्या नावाच्या प्रस्तावावर प्रतिक्रिया देताना त्यांनी, खर्गे यांच्यावर यापूर्वी अन्याय झाल्याची भावना आहे. काँग्रेस पक्ष काय म्हणते ते पाहूया. मल्लिकार्जुन खर्गे यांनी अद्याप काहीही मागितलेले नाही. पक्षाचे म्हणणे आपण सर्वांनी ऐकले पाहिजे. मीसुद्धा ऐकेन आणि सिद्दरामय्या देखील ऐकतील असे सांगत त्यांनी सिद्दू गटाला एकप्रकारचा संदेश दिला. काँग्रेस पक्ष लवकरच तिसरी यादी जाहीर करेल, असे ते म्हणाले.

Tags: