Belagavi

अक्कमहादेवी यांचे जीवन समाजासाठी आदर्श : इंदिरा मोटेबेन्नूर

Share

अक्कमहादेवी यांचे जीवन समाजासाठी आदर्श व प्रेरणादायी आहे असे विचार इंदिरा मोटेबेन्नूर यांनी मांडले.

बेळगावातील महांतेश नगरमधील हलकट्टी भवन येथे साप्ताहिक सामूहिक प्रार्थना, आंतरराष्ट्रीय महिला दिन आणि वैराग्य निधी अक्कमहादेवी जयंती तसेच उन्हाळी सुट्टीत इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी गुरु बसव ज्ञान केंद्राचे उद्घाटन असा संयुक्त कार्यक्रम पार पडला.

याप्रसंगी प्रमुख वक्त्या म्हणून बोलताना इंदिरा मोटेबेन्नूर यांनी अक्कमहादेवी यांचे बालपण, वैराग्य निधी म्हणून कल्याणमध्ये प्रवेश करण्याची घटना आणि कदळी येथे लिंगैक्य झाल्याचा घटनाक्रम सांगितला.

श्रुती गुडस यांनीही अक्कमहादेवी-अल्लमप्रभू यांच्यातील संभाषणाबद्दलच्या भावना व्यक्त केल्या.
प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारत लिंगायत महासभा बेळगावच्या जिल्हा शाखा अध्यक्षा रत्नाक्का बेल्लद यांनी लिंगायत संघटनेच्या कार्याचे कौतुक केले. लिंगायत महिला शाखेच्या संस्थापक अध्यक्षा शैलजा भिंगे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात शहीदांनी समाजासाठी दिलेल्या प्रेरणादायी संदेशांचे स्मरण केले. डॉ. दानम्मा झळकी यांनी गुरु बसव नॉलेज सेंटरचा उद्देश आणि गरज याबद्दल सांगितले.

यावेळी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष एरण्णा दयेन्नावर व प्रसाद हिरेमठ उपस्थित होते. श्रीदेवी नरगुंद यांनी प्रास्ताविक केले. सुवर्णा बडिगेर यांनी आभार मानले. सदाशिव देवरमणी आणि कमला गणाचारी यांनी सूत्रसंचालन केले.

संस्थेचे माजी अध्यक्ष शशिभूषण पाटील, कार्यक्रमाचे उपाध्यक्ष संगमेश अरळी आणि कार्यकारी संचालक सुरेश नरगुंद यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. पदाधिकारी शंकर शेट्टी, बसवप्रभू पाटील यांनी सहभाग घेतला. संस्थेच्या इमारत उभारणीत योगदान देणारे रमेश तुबची यांचा गौरव करण्यात आला.

प्रसाद सेवा दासोही विजय हुदलीमठ परिवारातर्फे करण्यात आली. नेत्रा रामापुरी, अनुसया, महानंदा परुशेट्टी यांनी अनिता शेट्टर यांच्या नेतृत्वाखाली वचन गायन झाले. दीपा पाटील व लक्ष्मी जीवनी यांनी नृत्य सादर केले. कार्यक्रमाला महांतेश मेनसीनकाई व संस्थेचे सभासद उपस्थित होते.

Tags: