Belagavi

कपरट्टी येथे 3.5 लाखाची 656.640 लिटर दारू जप्त

Share

अबकारी खात्याच्या पथकाने एका घरावर छापा मारून 3.5 लाखाची 656.640 लिटर दारू जप्त केली.

रविवारी दि. 9-4-2023 रोजी सायंकाळी 7.25 वाजता गोकाक अबकारी झोन अंतर्गत येणाऱ्या कपरट्टी क्रॉस येथील एका घरावर बेकायदेशीर दारूचा साठा केल्याच्या गुप्त माहितीवरून ही कारवाई करण्यात आली. यावेळी एकूण 656.640 लिटर दारू जप्त करण्यात आली.

उत्पादन शुल्क निरीक्षक, उपनिरीक्षक आणि कर्मचारी यांच्यासमवेत हा छापा टाकण्यात आला. या घरामध्ये विविध प्रकारच्या ब्रॅंड्सचे दारूचे 76 बॉक्स आढळून आले. सदर दारू जप्त करण्यात आली असून त्याची अंदाजे किंमत 3,50,000/- इतकी आहे. गुन्हा क्रमांक 45/2022-23 अन्वये घराच्या मालकाविरुद्ध गोकाक सेक्टरमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Tags: