National

आजच सेव्ह करा तुमचा डेटा, 31 मे पासून बंद होणार ‘हे’ ऍप्स; गुगलचा मोठा निर्णय!

Share

गुगल प्ले स्टोअरने पर्सनल लोन ऍप्स पॉलिसीबद्दल नवीन अपडेट जाहीर केले आहे. या अपडेटसह अनेक ऍप्सवर निर्बंध घातले आहेत, ज्यामुळे युजर्सच्या मोबाईल स्टोअरेजमधून त्यांचे फोटोज, व्हिडीओ, कॉन्टॅक्ट, लोकेशन आणि कॉल लॉगमध्ये पोहोचण्यापासून रोखलं जाईल. गुगलचे नवीन धोरण पुढील महिन्याच्या शेवटच्या म्हणजे 31 मे 2023 पासून लागू होणार आहेत.
गुगलने आपले नवीन आर्थिक सेवा धोरण जारी करताना जाहीर केले आहे, त्यानुसार ते 31 मे 2023 पूर्वी प्ले स्टोअर ऍप्सवर उपलब्ध ऑनलाइन कर्ज देणार्‍या ऍप्सवर बंदी घालतील.

अशा परिस्थितीत जे लोक हे ऍप्स वापरतात आणि ज्यांच्या फोनशी संबंधित वैयक्तिक डेटा आहे, त्यांनी त्यांचा डेटा सुरक्षित ठेवावा किंवा डेटा हटवावा, हे लक्षात ठेवणे चांगले होईल, अन्यथा 31 मे पूर्वी, त्यानंतर त्यांचा डेटा आपोआप हटवले जाईल.

ऑनलाइन कर्ज देणाऱ्या ऍप्सवर अनेक दिवसांपासून फसवणूक होत असल्याचा आरोप होत आहे. ही समस्या लक्षात घेऊन केंद्र सरकारने या ऍप्सबाबत कडक धोरण अवलंबले आहे. हे ऍप्स मर्यादित आहेत जे कर्ज देणारे आहेत.

त्याशिवाय, या ऍप्सवर वापरकर्त्यांचा संपर्क, फोटो इत्यादी संवेदनशील डेटा चोरल्याचा आरोप देखील होता. पर्सनल लोन देणाऱ्या प्ले स्टोअरवरील हजारो ऍप्सवर निर्बंध घालून न्यायालय आणि रिझर्व बँकने दिलेल्या सावधानतेच्या इशाऱ्याला गुगलने सकारात्मक प्रतिसाद दिला होता. यानंतर कंपनीने परवाना नसलेले लोन ऍप्स गुगल प्ले स्टोअरवरुन हटवण्यासाठी कडक निर्बंध घालणारे नियम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

Tags: