Dharwad

अपघातात मृत्यू झालेल्या तरुणीचे मरणोत्तर नेत्र आणि अवयवदान

Share

काल झालेल्या रस्ता अपघातात गंभीर जखमी झालेल्या तरुणीचा मृत्यू झाला असून, या तरुणीच्या कुटुंबीयांनी तिचे मरणोत्तर अवयवदान केले .

धारवाड तालुक्यातील उप्पिन बेटगेरी गावातील अक्षता अशोक दोडवाड (21) हिचा काल अपघात झाला. उप्पिन बेटगेरी येथील बैलहोंगल रस्त्यावर, गोशाळेत जाऊन परतत असताना दुचाकींचा अपघात झाला. गंभीर जखमी झालेल्या अक्षताला धारवाड येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचाराला प्रतिसाद न मिळाल्याने आज अक्षताचा मृत्यू झाला.

अक्षताच्या मृत्यूच्या दु:खातही , तिच्या कुटुंबीयांनी अक्षताचे डोळे आणि किडनीसह अवयव दान दान केले आहेत

Tags: