Dharwad

निवडणूक कर्तव्यात हलगर्जीपणा : हेस्कॉम अधिकारी निलंबित

Share

निवडणूक कर्तव्यात हलगर्जीपणा केल्यावरून हेस्कॉमचे अधिकारी नागराज कुबहळ्ळी यांना धारवाडचे जिल्हाधिकारी गुरुदत्त हेगडे यांनी कर्तव्यावरून निलंबित करण्याचा आदेश जारी केला आहे.

नागराज कुबहळ्ळी हे नवलगुंद मतदारसंघाचे फ्लाइंग स्क्वॉड होते. सी-व्हिजिल ऍप वापरण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाचे या अधिकाऱ्याने पालन केले नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत जारी केलेल्या नोटिसीला पत्राद्वारे उत्तर देण्याऐवजी नागराज यांनी व्हॉट्सऍपद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना उत्तर दिल्याने त्यांना कर्तव्यावरून निलंबित करण्यात आले आहे.

Tags: