मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी 11 एप्रिलपर्यंत मुभा असेल, असे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी सांगितले.
कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांना उमेदवारी अर्ज सादर करण्याचा 20 हा शेवटचा दिवस आहे. नॅशनल व्होटर सर्व्हिस पोर्टल (NVSP) वर लॉग इन करून लोक त्यांचे नाव नोंदणी करू शकतात किंवा मतदार यादीत त्यांचे नाव असल्याची खात्री करू शकतात. याशिवाय पात्र मतदार फॉर्म-6 भरून व्होटर हेल्प लाइन ऍपद्वारेही आपली नावे नोंदवू शकतात, असे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी सांगितले.
आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता जनतेने आपली नावे मतदार यादीत असल्याची खात्री करावी. नाव नसल्यास एप्रिल 11 पर्यंत नाव समाविष्ट करण्याची संधी असेल असे सांगण्यात आले. या संधीचा जनतेने उपयोग करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी पत्रकात केले आहे.


Recent Comments