बेळगाव एपीएमसीत कांद्याचे भाव घसरल्याने शेतकरी चिंतेत पडले आहेत. लाल आणि पांढरा या दोन्ही कांद्यांचे दर गडगडले आहेत.

बेळगाव बाजारपेठेत विशेषतः एपीएमसीत महाराष्ट्रातील अहमदनगर, पुणे आदी जिल्ह्यांत पिकवलेल्या कांद्याचा पुरवठा केला जातो. गेल्या आठवड्यापासून कांद्याची आवक वाढली आहे. त्यामुळे कांद्याच्या दरात घसरण झाली आहे. गेल्या आठवड्यात 100 ट्रक्स तर या आठवड्यात 60 ट्रक्स कांद्याची आवक झाली आहे. अधिकतर कांदा लाल आहे. आवक वाढल्यामुळे कांद्याच्या दरात घसरण झाल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
या संदर्भात माहिती देताना कांद्याचे घाऊक व्यापारी अशोक पवार यांनी सांगितले की, गेले दोन आठवडे बेळगाव एपीएमसीत कांद्याची आवक वाढली आहे. गेल्या आठवड्यात 100 ट्रक्स तर या आठवड्यात 60 ट्रक्स कांद्याची आवक झाली आहे. त्यामुळे दरात घसरण झाली आहे. लाल कांद्याचा दर प्रति क्विंटल 800 ते 1200 रुपये आहे.
पांढऱ्या कांद्याचा दरही 800 ते 1500 रुपये आहे. कांद्याच्या निर्यातीला बंदी असल्याने देशांतर्गत बाजारपेठांत कांदा विक्रीसाठी पाठविण्यात येतो. बेळगाव बाजारपेठेत पुणे आणि नगर जिल्ह्यातील कांदा विक्रीसाठी येतो. उत्पादन वाढून आवक वाढल्याने दर घसरले आहेत. मात्र चांगल्या दर्जाच्या कांद्याला मागणी आहे असे पवार यांनी सांगितले.
एकंदर, उत्पादन आणि आवक वाढल्याने कांद्याचे दर गडगडल्याने शेतकऱ्यांना मात्र याचा फटका बसत आहे.


Recent Comments