Belagavi

हॉकी बेळगावतर्फे १० एप्रिलपासून मोफत हॉकी प्रशिक्षण शिबिर

Share

बेळगाव सारख्या ठिकाणी अनेक हॉकीपटूंनी आपल्या अप्रतिम कौशल्याने आणि तल्लख प्रतिभेने ऑलिंपिक मध्ये देशाचे प्रतिनिधित्व केले आहे. मात्र अलीकडे हॉकी खेळाची क्रेझ आणि उत्साह कमी झाला असून बेळगावने हॉकीसाठी असलेली ख्याती गमावली आहे. ती पुन्हा मिळविण्यासाठी आणि तरुणांना केवळ हॉकी खेळण्यासाठीच नव्हे तर शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त होण्यासाठी तसेच विविध स्तरांवर स्वतःचे प्रतिनिधित्व सिद्ध करण्यासाठी मदत व्हावी या उद्देशाने हॉकी बेळगावने तरुणांसाठी मोफत हॉकी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले आहे.

गुळाप्पा होसमनी (हॉकी बेळगावचे अध्यक्ष), सुधाकर चाळके (हॉकी बेळगावचे सचिव) यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर होणार आहे. या शिबिरात माजी लष्करी अधिकारी गोपाळ खांडे, उत्तम शिंदे, नामदेव सावंत आणि शारीरिक संचालक प्रशांत मंकाळे हे तरुणांना प्रशिक्षण देणार आहेत.

हॉकी प्रशिक्षण शिबिर यश इव्हेंटसने प्रासोजित केले आहे. शहरातील सुभाष चंद्र बोस (लेले मैदान) येथे रविवार वगळता १० एप्रिल ते १० मे २०२३ पर्यंत दररोज सकाळी ६.३० ते ८.३० आणि संध्याकाळी ४ ते ६ या वेळेत हे प्रशिक्षण शिबिर होणार आहे.
शिबिरासाठी नाव नोंदणी सुरू असून इच्छुकांनी वैदुर्य नाईक : 7026719824, चेतन दोड्डमणी : 8867213306, आणि प्राजक्ता निलजकर : 7022506074 यांच्याशी संपर्क साधावा, इच्छुक तरुणांनी बहुसंख्येने शिबिरात सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

Tags: