Belagavi

‘अब रुल पुष्पा का’; पुष्पा-2 चा अंगावर शहारे आणणारा व्हिडीओ रिलीज

Share

आता पुष्पाः2 (Pushpa 2) चित्रपटाचा एक खास व्हिडीओ चित्रपटाच्या निर्मात्यांनी शेअर केला आहे.
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या पुष्पा (Pushpa: The Rise – Part 1) या चित्रपटानं केवळ भारतातीलच नाही तर जगभरातील प्रेक्षकांची मनं जिंकली. पुष्पा चित्रपटातील श्रीवल्ली आणि पुष्पाची केमिस्ट्री प्रेक्षकांना आवडली.

आता पुष्पाः2 (Pushpa 2) चित्रपटाचा एक खास व्हिडीओ चित्रपटाच्या निर्मात्यांनी शेअर केला आहे. टी-सीरिजच्या युट्यूब चॅनलवर पुष्पा-2 या चित्रपटाचा हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.
व्हिडीओच्या सुरुवातीला एक वृत्तनिवेदक पुष्पाबद्दल माहिती देताना दिसत आहे. तो म्हणतो, ‘तिरुपती तुरुंगातून पुष्पा फरार झाला आहे.’ तर दुसरी न्युज अँकर म्हणते, ‘पुष्पाला पकडण्यासाठी पोलिसांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या’. आता तुरुंगातून फरार झालेला पुष्पा हा कुठे गेला आहे? असा प्रश्न सर्वांना पडतो. पण याचं उत्तर या व्हिडीओच्या शेवटी कळते. पुष्पा हा तुरुंगातून फरार होऊन जंगलामध्ये जातो. एका कॅमेऱ्याच्या फुटेजमध्ये पुष्पाची झलक दिसते.


टी-सीरिजच्या युट्यूब चॅनलवर शेअर करण्यात आलेल्या पुष्पा-2 चित्रपटाच्या या व्हिडीओमध्ये अल्लू अर्जुन ‘अब रुल पुष्पा का’ हा डायलॉग म्हणताना दिसत आहे

Tags: