भाजपची उमेदवार यादी यथावकाश होईल जाहीर; काळजी नको, प्रतीक्षा करू असे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई सांगितले.
शिमोगा येथे प्रसार माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री बोम्मई म्हणाले की, जेव्हा इच्छुकांची संख्या अधिक असते तेंव्हा स्वाभाविकपणे स्पर्धा होतेच. पक्षाच्या निवडणूक निवड समितीची 8 आणि 9 तारखेला बैठक होईल आणि त्यानंतर उमेदवारांची यादी जाहीर केली जाईल. भाजपची यादी नियोजनपूर्वक लोकशाही पद्धतीने तयार केली जात आहे. सर्व स्तरावरील, तालुका व जिल्हास्तरीय समित्यांवरील भाजप कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन आणि जनतेच्या भावना लक्षात घेऊन ही यादी तयार करण्यात आली आहे. तीन उमेदवारांची यादी तयार करून मतदारसंघात पाठवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
काँग्रेसवर टीका करताना बोम्मई म्हणाले की, काँग्रेस पक्षाला 60 मतदारसंघात योग्य उमेदवार मिळत नाहीयेत म्हणून इथून-तिथून उमेदवार आणून तिकीट देण्याचा प्रयत्न करत आहेत. केपीसीसीचे अध्यक्ष डीके शिवकुमार यांनी त्यांची दुसरी यादी जाहीर होण्यापूर्वी भाजपच्या बहुतांश आमदारांना, आम्ही तुमच्यासाठी तिकीट राखून ठेवले असून आमच्या पक्षात येणार का? असे विचारले होते. काँग्रेसवाले बाहेरून शौर्याने बोलतात पण आतून वस्तुस्थिती वेगळी आहे. काँग्रेसकडे योग्य उमेदवार नाहीत, तळागाळात संघटन नाही, योग्य राजकीय विचारधारा नाही आणि विकासाचे राजकारण नाही, असे ते म्हणाले. अंतर्गत आरक्षणासह सर्व काही रद्द करू या केपीसीसी अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांच्या विधानाला उत्तर देताना आम्ही दिलेल्या आरक्षणाला कोणीच हात लावू शकत नाही. हिंमत असेल तर, अंतर्गत आरक्षण रद्द करा, असे आव्हान बोम्मई यांनी दिले.
‘महेश कुमठळ्ळी आपल्या पराभवाचे खापर माझ्या डोक्यावर बसवण्याचा प्रयत्न करत आहेत’, या लक्ष्मण सवदी यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना बोम्मई म्हणाले की, असे काहीही नाही. लक्ष्मण सवदी हे भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी डीसीएम आहेत. मला माहीत आहे की त्यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव आहे. त्याच्याशी बोलून सर्व काही ठीक होईल असे ते म्हणाले.
मुख्यमंत्र्यांना पाठिंबा दिल्याच्या पार्श्वभूमीवर अभिनेते सुदीप यांच्यावर टीका होत असल्याच्या मुद्द्यावर उत्तर देताना कोणाला पाठिंबा द्यायचा आणि इतर पक्षांनी त्यांना प्रचारासाठी बोलावले तर जायचे की नाही ते त्यांच्या हाती आहे. कठीण प्रसंगी मदत केली म्हणून आलो, बाकीचे कोणी आलेले नाही असे त्याने म्हटले आहे, असे बोम्मई यांनी सांगितले. सुदीपला दिलेल्या धमकीच्या पत्राबाबत बोलताना हे सगळे झाल्यावरच सुदिपने पत्रकार परिषद घेतल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. बाईट
एकंदर, भाजपची यादी यथावकाश होईल, काळजी नको असे सांगत काँग्रेसचा निवडणुकीत दारुण पराभव होईल असे बोम्मई यांनी म्हटले आहे.
Recent Comments