काँग्रेसच्या पारंपरिक निष्ठावंत इनामदार डावलून कित्तूर मतदारसंघातून बाबासाहेब पाटील यांना काँग्रेसचे उमेदवार म्हणून रिंगणात देण्याचा निर्णय होताच कित्तूर मतदारसंघात बंडाचे वादळ उठले आहे. काँग्रेस पक्षाच्या या निर्णयाचा निषेध करत डी. बी. इनामदार यांच्या समर्थकांनी नेगीनहाळासह विविध गावांमध्ये निदर्शने केली तर इनामदार कुटुंबीयांनी सामुहिकपणे काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला आहे.

डी. बी. इनामदार यांची सून लक्ष्मी विक्रम इनामदार यांनी गुरुवारी सायंकाळी नेगीनहाळ गावातील इनामदार यांच्या घरी जमलेल्या चाहत्यांना संबोधित करताना सांगितले की, मोठ्या साहेबांची तब्येत ठीक नाही. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असताना काँग्रेसने आम्हाला आणखी वेदना देण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही कुटुंबातील सर्व सदस्यांनी काँग्रेसचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे.त्यामुळे काँग्रेसशी आमचे संबंध तूटले आहेत असे सांगत नाराजी व्यक्त केली.
डी. बी.इनामदार हे बोलण्याच्या स्थितीत नाहीत. त्यांच्या वतीने वक्तव्य करण्याएवढे आम्ही मोठे नाही. काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय कुटुंबातील सर्व सदस्यांचा असल्याचे सांगून लक्ष्मी यांनी चाहत्यांसमोर अश्रू ढाळले.
दरम्यान, यावेळी जमलेल्या इनामदार कुटुंबियांच्या चाहत्यांनी काँग्रेसच्या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त करत काँग्रेसला धडा शिकविण्याची मागणी केली.


Recent Comments