Belagavi

गुड फ्रायडे निमित्त सप्त वाक्य ध्यान आराधना कार्यक्रम

Share

बेळगावातील सेंट्रल मेथोडिस्ट चर्चमध्ये गुड फ्रायडे निमित्त सप्त वाक्य ध्यान आराधना कार्यक्रम भक्तिभावाने पार पडला.

शुभ शुक्रवार अर्थात गुड फ्रायडे निमित्त बेळगावातील सेंट्रल मेथोडिस्ट चर्चमध्ये 2ते 6 एप्रिल या काळात सप्त वाक्य ध्यान आराधना या विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात मानवाच्या हातून घडलेल्या चुका, पापांबद्दल प्रभू येशू ख्रिस्ताची माफी मागून पश्चाताप करण्यासाठी प्रार्थना करण्यात आली. बेळगाव शहर व परिसरातील मेथडिस्ट ख्रिश्चन बांधवानी या कार्यक्रमात सहभागी होऊन पापमुक्तीसाठी ईश्वराची प्रार्थना केली.

या संदर्भात माहिती देताना सेंट्रल मेथोडिस्ट चर्चचे सभापालक शांतप्पा अंकलगी-ऐनावर यांनी सांगितले की, प्रभू येशू ख्रिस्तांचा पापमुक्तीचा संदेश सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी या विशेष ध्यान-आराधना कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. जगातील सर्व लोकांचे कल्याण करण्यासाठी, त्यांना पाप-दोषातून मुक्ती देण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्तांनी या पृथ्वी तलावर माणूस म्हणून जन्म घेतला. सर्वांशी सामान्य माणसाप्रमाणे वागून प्रेमाचा, बंधुभावाचा संदेश दिला.

याच संदेशाचे पालन करून एकमेकांवर प्रेम करून, आपुलकीने राहून, भगवंताकडे पाप-दोष मुक्तीची प्रार्थना करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे असे त्यांनी सांगितले. बाईट
बेळगाव परिसरातील अनेक ख्रिस्ती बांधवानी यात भाग घेतला.

Tags: