Belagavi

टिळकवाडीतील के. बी. कुलकर्णी आर्ट गॅलरीत पेंटिंग्ज प्रदर्शन

Share

बेळगावातील टिळकवाडीतील वरेरकर नाट्यसंघाच्या के. बी. कुलकर्णी आर्ट गॅलरीत रंग आणि कुंचल्याच्या अनोख्या आविष्कारातून जणू राधाकृष्णाचे भावविश्व प्रकटले आहे.
होय, बेळगावातील टिळकवाडीतील वरेरकर नाट्यसंघाच्या के. बी. कुलकर्णी आर्ट गॅलरीत रंग आणि कुंचल्याच्या अनोख्या आविष्कारातून जणू राधाकृष्णाचे भावविश्व प्रकटले आहे. कोल्हापूरचे चित्रकार जगन्नाथ भोसले यांच्या संकल्पनेतून राधा आणि कृष्णाचे प्रेममय भावविश्व

येथे साकारले आहे. त्यांनी रेखाटलेल्या आकर्षक, सुंदर, मनमोहक पेंटीग्जचे प्रदर्शन येथे भरविण्यात आले आहे. गुरुवारी या प्रदर्शनाचे उदघाटन झाले असून ते चार दिवस चालणार आहे. राधा आणि कृष्णाच्या जीवनातील तरल प्रेममय प्रसंग त्यांनी पेंटिंग्जमधून हुबेहूब, लीलया साकारले आहेत.

या संदर्भात ‘आपली मराठी’ला माहिती देताना चित्रकार जगन्नाथ भोसले यांनी सांगितले की, गेली 35 वर्षे मी चित्रकार म्हणून काम करत असून, राधा-कृष्णाच्या थीमवर आधारित पेंटिंग्जचे बेळगावातील आपले हे पहिलेच प्रदर्शन आहे. या दोघांच्या जीवनावर आधारित एकूण 60 पेंटिंग्ज येथे मांडली असून, त्यापैकी मॉडर्न आणि रिऍलिस्टिक शैलीची 21 पेंटिंग्ज असून, उरलेली लँडस्केप आणि अन्य आहेत. यापूर्वी मी ऐतिहासिक आणि पौराणिक कथा-संकल्पनांवर

आधारित पेंटिंग्ज रेखाटली असून गेल्या तीन वर्षांपासून राधाकृष्णाच्या थीमवर आधारित पेंटिंग्ज रेखाटत आहे. यापूर्वी माझ्या पेंटिंग्जची मुंबई, पुणे, बेंगळूर, कोल्हापूर आदी अनेक शहरात वैयक्तिक आणि सामूहिक प्रदर्शने भरली असून, बेळगावातील हे 18वे प्रदर्शन आहे. बेळगावकर रसिकांनी प्रदर्शनाला भेट देऊन प्रोत्साहन द्यावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

 


एकंदर जगन्नाथ भोसले यांच्या या चित्रकृतीच्या प्रदर्शनातून बेळगावकरांना राधाकृष्णाच्या जीवनावर आधारित नयनरम्य पेंटिग्ज पाहण्याची संधी उपलब्ध झाली आहे. रसिक बेळगावकरांनी या प्रदर्शनाला नक्कीच भेट द्यायला हवी.

Tags: