Belagavi

जागतिक आरोग्य दिनानिमित्त जायंट्सतर्फे मार्गदर्शन पत्रिकेचे वाटप

Share

जागतिक आरोग्य दिनानिमित्त जायंट्स ग्रुप ऑफ बेलगाम मेन यांच्या वतीने आज उचगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये सर्वांसाठी चांगले आरोग्य अशी पत्रिका काढून वाटण्यात आले

या पत्रिकेमध्ये जागतिक आरोग्य दिनानिमित्त नागरिकांनी कोणत्या कोणत्या प्रकारचा आपल्या शरीरासाठी उपयुक्त असला आहार घ्यावा व कोणत्या प्रकारचा आहार घेऊ नये हे या पत्रकामध्ये नमूद करण्यात आलेले होते

यावेळी जायंट्स ग्रुप ऑफ बेलगाम मेन अध्यक्ष सुनील मुतकेकर उपाध्यक्ष अविनाश पाटील मदन बामणे अरुण काळे सचिव लक्ष्मण शिंदे राहुल बेळवलकर मधु बेळगावकर यल्लाप्पा पाटील आनंद कुलकर्णी नारायण किटवाडकर भाऊ बंडाचे यांच्यावतीने उचगाव गावातील नागरिकांना जागतिक आरोग्य दिनानिमित्त माहिती सांगण्यात आली

छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये हा कार्यक्रम घेऊन माहिती पत्रके वाटण्यात आली या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी उचगाव ग्रामपंचायतचे अध्यक्ष जावेद जमादार उपाध्यक्ष मथुरा तेरसे सदस्य बाळकृष्ण तेरसे एल डी चौगुले उमेश बुवा गजानन नाईक शशिकांत जाधव एन ओ चौगुले उपस्थित होते यावेळी जागतिक आरोग्य दिनानिमित्त पंचायत सदस्य एल डी चौगुले यांनी आपले विचार मांडले यावेळी जायंट्स ग्रुप ऑफ बेलगाम मेनचे सचिव लक्ष्मण शिंदे यांनी आभार मानले.

Tags: