Belagavi

वडगाव येथे भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात बालक जखमी

Share

बेळगावातील वडगावमधील संभाजीनगर येथे भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात पाच वर्षीय बालक जखमी झाल्याची घटना घडली आहे.

वडगावमधील संभाजीनगरमधील रिद्देश सुनील ओऊळकर या ५ वर्षीय मुलावर भटक्या कुत्र्यांच्या कळपाने हल्ला करून जखमी केले. संभाजीनगर,

आनंदनगर, केशवनगर, यरमाळ रोड आदी परिसरात सध्या भटक्या कुत्र्यांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. रस्त्यावर खेळणारी मुले, त्यांचे लक्ष्य ठरत आहेत.

सध्या शाळांना सुट्या पडल्याने लहान मुले घरासमोर रस्त्यावर खेळत असतात.

त्यांच्यावर ही कुत्री हल्ला करत आहेत. या घटनेने परिसरातील नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले असून, महानगर पालिकेने भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी करण्यात येत आहे.

Tags: