रमेश जारकीहोळी यांनी कुमठल्ली यांना आपण काय बोललो याची आठवण करून दिली असता ते सर्व हायकमांडवर अवलंबून असून तेथून जो निर्णय येईल तो आपण पाळणार असल्याचे सांगितले.
अथणीचे आमदार महेश कुमठल्ली याना विधानसभा निवडणुकीत भाजपकडून तिकीट मिळणार की नाही हे अनिश्चित आहे.
त्यांना तिकीट न मिळाल्यास निवडणूक लढवणार नसल्याचे रमेश जारकीहोळी यांनी सांगितल्याने प्रदेश भाजप नेतृत्वाची कोंडी झाली आहे. आज बंगळुरू येथे प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना कुमठल्ली यांनी तिकीट मिळण्याचा विश्वास व्यक्त केला. रमेश जारकीहोळी यांनी सांगितलेल्या गोष्टीची त्यांना आठवण करून दिली असता अथणीचे आमदार म्हणाले की, हे सर्व हायकमांडवर अवलंबून आहे आणि तेथून जो निर्णय येईल तो आपण मानू.


Recent Comments