हनुमान नगर येथील हनुमान मंदिरात दरवर्षीप्रमाणे हनुमान जयंती आणि महाप्रसाद कार्यक्रम मोठया उत्साहात पार पडला .
बेळगाव शहरातील हनुमान नगर येथील हनुमान मंदिरात गेल्या पंधरा वर्षांपासून , हनुमान जयंतीचे औचित्य साधून महाप्रसादाचे आयोजन केले जाते . यंदा देखील इथल्या हनुमान महाप्रसाद कमिटीच्या वतीनं वतीने महाप्रसादाच्या आयोजन करण्यात आले होते .
यासंबंधी माहिती देताना , हनुमान महाप्रसाद कमिटीचे सेक्रेटरी दिवाकर देशपांडे यांनी सांगितले कि , आम्ही दरवर्षी , या दिवशी , महाप्रसादाचे आयोजन करतो . आठ ते ९ हजार लोक या महाप्रसादासाठी येतात . यासाठी इथल्या लोकांचे सहकार्य खूप चांगले लाभते . आतापर्यंत जसे सहकार्य दिलेत तसेच यापुढे देण्याचे त्यांनी आवाहन केले . त्याचप्रमाणे या भागातील एकी अशी कायम ठेवा . सर्वांच्या सहकार्याने हा कार्यक्रम असाच दरवर्षी मोठ्या प्रमाणात करूयात असे सांगून त्यांनी , सर्वाना सुखी ठेव अशी प्रार्थना बजरंगबलीना केली .

तर आणखी एका पदाधिकाऱ्यांनी सांगितले कि इथल्या जनतेच्या तन , मन, आणि धन, अर्पून केलेल्या सहकार्यामुळेच आम्ही हा महाप्रसादाचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर करू शकलो . या मंदिराचा महाप्रसाद ग्रहण करण्यासाठी , सह्याद्रीनगर , सदाशिवनगर , कुवेम्पू नगर , आंबेडकर नगर, जाधव नगर यासहित अगदी शहापूर , टिळकवाडी येथून भक्तगण येतात . आणि श्रींचे दर्शन घेऊन महाप्रसाद ग्रहण करतात .
श्री हनुमान जयंतीनिमित्त , या मंदिरात महिलांनी पाळणा कार्यक्रम पार पाडला . शिवाय हनुमानाच्या मूर्तीला सकाळी अभिषेक , पूजा , आरती करण्यात आली . फुलांनी मंदिर आणि गाभाऱ्याची सजावट करण्यात आली होती .


Recent Comments