Chikkodi

निपाणी मतदारसंघासाठी काकासाहेब पाटील याना काँग्रेसची उमेदवारी

Share

निपाणीतून काकासाहेब पाटील यांना काँग्रेसचे तिकीट जाहीर करण्यात आल्याने , कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करून आनंदोत्सव साजरा केला .

2023 च्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज काँग्रेसची दुसरी यादी जाहीर झाली असून त्यात निपाणीतून माजी आमदार काकासाहेब पाटील यांचे तिकीट अंतिम आहे.त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांनीनिपाणी येथील काँग्रेस कार्यालया जवळ फटाके फोडून आणि मिठाई वाटून आनंद साजरा केला.

गेल्या वेळी भाजपच्या विद्यमान आमदार शशिकला जोल्ले यांच्या विरोधात काकासाहेबांचा काही मतांनी पराभव झाला होता.आता काकासाहेब पाटील यांची आणखी एक परीक्षा आहे .

Tags: