धारवाडचे जिल्हा पंचायत सदस्य योगेश गौडा यांच्या हत्येप्रकरणातील 17 वा आरोपी शिवानंद बिरादार याला माफीचा साक्षीदार होण्यास उच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे.
न्यायमूर्ती के. नटराजन यांच्या अध्यक्षतेखालील उच्च न्यायालयाच्या एकल सदस्यीय खंडपीठाने ही परवानगी दिली. यासाठी यापूर्वी सत्र न्यायालयाने परवानगी नाकारल्याच्या आदेशाला आव्हान देणार्या विजापूरच्या शिवानंद श्रीशैल बिरादार यांने दाखल केलेल्या याचिकेची सुनावणी केल्यानंतर हा हायकोर्टाने आदेश दिला. या खटल्यात बहुतांशी परिस्थितीजन्य साक्षीदार असल्याने माफीच्या साक्षीदाराने साक्ष दिल्यास दोषींना शिक्षा होणे सोयीचे होईल. त्यामुळे, त्याला फौजदारी संहिता (CrPC) कलम 306 अंतर्गत स्टेटमेंट रेकॉर्ड करण्यासाठी माफीचा साक्षीदार म्हणून परवानगी द्यावी अशी विनंती आरोपीने केली होती. शिवानंद बिरादार याने हत्या करणाऱ्या आरोपींना पिस्तूल दिल्याचा आरोप आहे.
माजी मंत्री विनय कुलकर्णी हे या हत्याकांडातील प्रमुख आरोपी आहेत. त्यामुळे आरोपी शिवानंद याने आपल्याला माफीचा साक्षीदार बनण्याची परवानगी द्यावी, असा अर्ज सत्र न्यायालयात केला होता. तथापि, 14 जून 2022 रोजी बेंगळुरूच्या लोकप्रतिनिधींच्या विशेष न्यायालयाने तशी परवानगी देण्यास नकार दिला होता.


Recent Comments