येत्या 7, 8 व 9 तारखेला बेळगावात तीन दिवस हरिदास महोत्सव आयोजित केला असून तो मोठ्या थाटात पार पाडण्यासाठी सर्व तयारी करण्यात आल्याची माहिती हरिभक्त मंडळाच्या वतीने बुधवारी शहरातील पत्रकार परिषदेत देण्यात आली.
याबाबत हरिदास सेवा समितीचे मानद अध्यक्ष रायचूर शेषगिरीदास यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले की, बेळगावच्या हरिदास सेवा समितीने बेळगाव येथील टिळकवाडी येथील मिलेनियम गार्डन येथे तीन दिवस भव्य हरिदास महोत्सवाच्या आयोजनाची जबाबदारी घेतली आहे. दररोज दुपारी 3-30 वाजता सुरु होणाऱ्या या कार्यक्रमात भजन, आशिर्वचन, व्याख्यान, दासवाणी, पुरस्कार प्रदान, सन्मान अशा विविध कार्यक्रमांतून हरिदासाना वंदन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. 7 तारखेला संध्याकाळी 4-30 वाजता परमपूज्य भीमनक्कट्टे मठाधिपती श्री रघुवरेंद्र तीर्थ यांच्या अमृत हस्ते महोत्सवाचे उद्घाटन होईल असे त्यांनी सांगितले.
यावेळी सुभाष काखंडकी यांना दास साहित्यातील ज्येष्ठ कर्तृत्ववानांना दिला जाणारा अनंताद्रीश पुरस्कार देण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. या तीन दिवसीय हरिदास महोत्सवाचा उद्देश हरिदासाच्या साहित्याचे मर्म आणि त्याचे महत्त्व समाजापर्यंत पोहोचवणे हा असल्याचे त्यांनी सांगितले.
या पत्रकार परिषदेला हरिदास सेवा समितीचे नेते भीमसेन मिरजी, जयतीर्थ सवदत्ती, केशव माऊली, मधुकर तेरदाळ, संजीव, प्रभाकर आदी उपस्थित होते.


Recent Comments