गुंजी जंगलात शेकरू प्राण्याची शिकार केल्याप्रकरणी , एकास अटक करण्यात आली असू , एम आरोपी फरार झाला आहे . आरोपीची हिंडलगा कारागृहात रवानगी करण्यात आली असून , शिकारीसाठी करण्यात आलेली बंदूक देखील जप्त करण्यात आली आहे .

लोंढा वनविभागाच्या गुंजी जंगलात शेकरू प्राण्याची शिकार झाल्याची माहिती लोंढा वनविभागाला मिळाली होती . याची गांभीर्याने दखल घेत , वनखात्याच्या अधिकाऱ्यांनी तातडीने गुंजी येथील लाद्र लुईस दामले, राहणार तीओली याला ताब्यात घेऊन चौकशी करून त्याच्याकडील शिकार केलेला शेकरू प्राणी ताब्यात घेतला . यावेळी त्याचा साथीदार सुनील हेब्बाळकर फरारी झाला आहे .
ही कारवाई सीसीएफ मंजुनाथ चव्हाण आणि डीएफओ हर्षा बानू यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून यावेळी एसीएफ संतोष चव्हाण लोंढा रेंजर राजू पवार , वनरक्षक नागराज भीमगौडरसह इतर या कारवाईत सहभागी होते .


Recent Comments